होम पेज

Online question पेपर कसा बनवायचा व सोडवायचा

१) सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz the generation असे type करा

२) त्यानंतर make a test हे option निवडून click करा

३) Question paper name..व आपल्याला हवा असलेला password तेथे टाका pasword लक्षात ठेवा

४)त्यांनतर add a question या option वर click करा

५)multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला

६)आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर तयारा प्रश्न पञिका published करा

७)प्रश्न पञिका published झाली की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz 68795 सदर लिंक ज्याला question paper सोडवायला दयायची त्याला पाठवा

८)नंतर आपण लिंक वर click करा students login निवडा student name टाका for ex.

महेश

९)सदर विद्यार्थी प्रश्न पञिका सोडवून submit करेल

विद्यार्थी response check  करण्यासाठी admin login ला जाऊन password टाका व report option वर जाऊन विद्यार्थ्यांनी सोडविलेलया प्रश्न गोषवारा आपणास मिळेल

चला तर मग techno teachers बनूया प्रगत महाराष्ट्र घडवूया

                      नाविन्यपूर्ण उपक्रम   

              शिक्षक स्वतः कल्पक असतात. शाळांमध्ये स्थानिक, भौगोलिक ,सामाजिक परिस्थिती स्तर विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. या उपक्रमांमुळे शिक्षक –विद्यार्थी, शिक्षक-पालक व समाज यांच्यामधील सहसंबंध सकारात्मक होतात. मुलांची एकाग्रता वाढावी,त्यांना सलगपणे बसण्याची सवय लागावी यासाठी काही छोटे छोटे खेळ/उपक्रम घेता येतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते.त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होतो गावाला शाळा आपली वाटते व शाळेला गाव आपले वाटते.  पर्यायाने मुलांचा, शाळेचा आणि गावाचा विकास होतो.
    वर्षभरात तालुक्यातील सर्व जि.प.व्यवस्थापनाच्या शाळां खालील उपक्रम राबविणार आहेत.

                          1.दैनंदिन उपक्रम

 
1) मुलांचे वाढदिवस साजरा करताना पुस्तक भेट देणे/घेणे.
2) उपस्थिती ध्वज.
3) आजचे राजकुमार व राजकुमारी – स्वच्छ व टापटीप गणवेश इ.
4) गृहपाठ तपासणी रोज करून प्रोत्साहनपर 1 ते 5 स्टार देणे.
5) विदयार्थ्यांसाठी गृहपाठ डायरी विकसित करणे व पालकांची स्वाक्षरी घेणे.
6) मधल्या सुटटीत कवितांची/पाढयांची कॅसेट लाऊडस्पीकरवर लावणे.
7) वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करणे.
8) दररोज मुलांना उपयुक्त असे अवांतर वाचन करावयास पुस्तके उपलब्ध करून देणे.
9) शाळा सुटण्यापूर्वी दिवसभरातील घटकांचे  विदयार्थी शंकांचे निरसन करणे.
10) गुरूजनांना अभिवादन/ वर्गमित्रांसोबत हस्तांदोलन.

error: Content is protected !!