विद्यार्थीचे आधार कार्ड valid करण्यासाठी उपयुक्त माहिती

शाळा सिद्धी पुरावे
March 3, 2023
नवोदय परीक्षा माहिती
July 22, 2024

  • विद्यार्थीचे आधार कार्ड valid करण्यासाठी सर्व प्रथम student update ला क्लिक करावे. इयत्ता, तुकडी निवडून go ला क्लिक करावे.

  • शाळेतील ज्या विद्यार्थी चे आधार कार्ड आपणास  update करायचे आहे, त्याच्या नावासमोर not validate असे लिहलेले दिसेल. म्हणजे हे विद्यार्थी आधार पोर्टल कडून invalid करण्यात आलेले आहेत.

  • सदर विद्यार्थी च्या नावासमोर view and update असा tab असेल त्याला क्लिक करा. सदर विद्यार्थी ची माहिती तुम्हाला दिसेल. आता त्या विद्यार्थी चा आधार कार्ड समोर घेऊन त्या विद्यार्थी चा first name मध्ये पहिले नाव आणि middle name मध्ये वडिलाचे नाव आणि surname मध्ये आडनाव लिहा. तद्नंतर आधार कार्ड मधील जन्मतारीख टाकून घ्या. तसेच आधार कार्ड मधील जे Gender असेल ते टाकून घ्या. वरील माहिती आधार कार्ड नंबर या tab मध्ये पुन्हा तशीच टाकून घ्या. किवा वरील माहिती तुम्ही कॉपी पेस्ट करून घेऊ शकता. तसेच पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर बरोबर टाकले आहे कि नाही याची शाश्वती करून घ्या. नंतर submit या tab ला क्लिक करा. student details save successfully असा msg येईल. 

  • त्या विद्यार्थी च्या नावासमोर validate हा  tab दिसेल त्याला क्लिक करा. सदर विद्यार्थी valid झाला असा msg स्क्रीनवर येईल. अशा प्रकारे तुम्ही student पोर्टलवर विद्यार्थीचे आधार कार्ड validate करून घेऊ शकतात. 

  • आधार कार्ड valid करताना उदभवणाऱ्या समस्या :

  • आधार कार्ड valid करत असताना आधार कार्ड वर विद्यार्थी चे नाव आणि आडनाव असेल तर अशा विद्यार्थी चे आधार कार्ड invalid दिसत असतात. अशा वेळी विद्यार्थीचे नाव आणि आडनाव लिहून घ्यावे आणि middle name मध्ये spacebar द्यावा. तसेच आधार कार्ड च्या tab मध्ये आधार वरील नाव आणि आडनाव लिहून घ्यावे आणि middle name मध्ये spacebar द्यावा आणि student data अपडेट करून घ्यावे आणि validate ला क्लिक करावे. आधार valid झालेला दिसेल.

  • आधार कार्ड वर फक्त  विद्यार्थीचे नाव असेल आणि वडिलाचे नाव आणि आडनाव नसेल  तर अशा विद्यार्थी चे आधार कार्ड invalid दिसत असतात. अशा वेळी विद्यार्थीचे नाव लिहून घ्यावे आणि middle name मध्ये spacebar द्यावा. तसेच surname मध्ये spacebar द्यावा आधार कार्ड च्या tab मध्ये आधार वरील नाव  लिहून घ्यावे आणि middle name व surname  मध्ये spacebar द्यावा आणि student data अपडेट करून घ्यावे आणि validate ला क्लिक करावे. आधार valid झालेला दिसेल.

  • आधार कार्ड valid होत नसेल तर युडायस पोर्टल वरील विद्यार्थी valid केले आहेत. तर अशा वेळेस त्या विद्यार्थी चे नाव पूर्ण copy करून paste करून घ्यावे जेणेकरून विद्यार्थी च्या नावात कोणत्याही प्रकारे चूक होणार नाही. विद्यार्थी चे आधार कार्ड valid होतील.

 

mm
kapilsankhe
Educational Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page